ऑलिम्पिकच्या तयारीसाठी अर्ज मागितले, कुस्ती महासंघाकडून राष्ट्रीय संघाची मोर्चेबांधणी सुरू

46

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थान कुस्ती महासंघाने (डब्ल्यूएफआय) 2020च्या टोकियो ऑलिम्पिक तयारीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय संघाच्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे गुरुवारी (दि.11) ‘डब्ल्यूएफआय’ने विविध पदांसाठी अर्ज मागितले आहे.

क्रीडाविश्वातील शिखर स्पर्धा असलेल्या ऑलिम्पिकच्या तयारीसाठी कुस्ती महासंघाने क्रीडा समुपदेशक, फिजियो व आहारतज्ञ आणि व्यवस्थापक पदांसाठी अर्ज मागितले आहेत. याचबरोबर पुरुष फ्रीस्टाईल, ग्रीको रोमन आणि महिला संघासाठी सहाय्यक स्टाफ ठेवण्याचाही महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ‘डब्ल्यूएफआय’कडून राष्ट्रीय कुस्ती संघासाठी व्यावसायिक व्यवस्थापक नियुक्त करण्यात येणार आहे.

खेळाडूंच्या तयारीत कुठलीच कमतरता न राहण्यासाठी या विविध पदांच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत, असे ब्रजभूषण शरण म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या