शाओमीचा फोन वापरणाऱ्यांना झटका, कंपनीने घेतला धक्कादायक निर्णय

98

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

शाओमी (xiaomi) कंपनीचा फोन वापरणाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी आहे. ‘रेड मी’ च्या 7 जुन्या स्मार्टफोनवर आता येथून पुढे अपडेट मिळणार नाही. याचाच अर्थ एमआय 11 चे अपडेट या फोन वापरकर्त्यांना मिळणार नाही. त्यामुळे या युझर्सला एमआय 10 या अपडेटवर आता काम चालवावे लागणार आहे.

एमआयने दिलेल्या माहितीनुसार, शाओमी रेमडी 6, रेडमी 6 ए, रेमडी वाय 2, रेडमी 4, रेडमी 4 ए, रेडमी नोट 4, रेडमी 3 एस, रेडमी 3 एक्स, रेडमी नोट 3 और रेडमी प्रो स्मार्टफोनला येथून पुढे नवीन अपडेट मिळणार नाही. त्यामुळे एमआय 11 या अपडेटमध्ये असणारे जाहिरात काढून टाकण्याचे फिचर वापरता येणार नाही. परंतु या फोनमध्ये अँड्रॉयड सिक्योरिटी अपडेट नियमीत मिळत राहणार आहे. याबाबत कंपनीने अद्याप माहिती दिलेली नाही.

कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला रेड मी नोट 7 सीरिज लॉन्च केली आहे. या स्मार्टफोनवरला अधिक महत्त्व मिळवून देण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे. त्यामुळे जुन्या स्मार्टफोटचे अपडेट काढण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या