संत गाडगेबाबा यांची जन्मभूमी शेंडगाव एक ऊर्जास्थळ – पालकमंत्री यशोमती ठाकुर

वैराग्यमूर्ती कर्मयोगी संत गाडगेबाबा यांनी झाडूच्या माध्यमातून समाजमन स्वच्छ केलीत.स्वतः निरक्षर असून सुद्धा बोलीभाषेत कीर्तन करून समाजप्रबोधन करण्यासोबतच समाजातील अनिष्ट रूढी,परंपरा यावर कठोर प्रहार करून जनजागृती करण्यासाठी आपलं अख्य आयुष्य खर्ची घातलं. त्यांचे पुरोगामी विचार चिरतरुण रहावेत यासाठी त्यांची जन्मभूमी शेंडगाव व कर्मभूमी ऋणमोचं, नागरवाडी यासह वलगाव,अमरावती येथील विकासकामासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकुर यांनी दिली.

18.63 कोटी रु खर्चाच्या कर्मयोगी संत गाडगेबाबा जन्मभूमी संयुक्त विकास आराखडा अंतर्गत शेंडगाव इथं विकास कामाच्या भूमिपूजना प्रसंगी त्या बोलत होत्या.

ठाकूर म्हणाल्या की, कर्मयोगी संत गाडगेबाबा यांचा जीवन प्रवास, फक्त समाजप्रबोधन सुधारणेसाठी वाहत राहिला. स्वतः निरक्षर असले तरी, त्यांनी बोली भाषेतील  कीर्तनाच्या माध्यमातून शिक्षणाच महत्व व सामाजिक कुप्रथा यावर घणाघाती प्रहार केलेत. मूर्तिपूजा व चमत्कार यात कोणतंच तथ्य नाही, यावर विश्वास ठेवू नका अस ते पोटतिडकीने नेहमी सांगत. त्यांच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या या भूमीच्या मातीत वेगळा गंध आहे. इथल्या चराचरात गाडगेबाबा वास करतात त्यामुळंच इथं नतमस्तक झाल्या नंतर समाजासाठी काही तरी करण्याची ऊर्जा मिळते असेही ठाकूर म्हणाल्या.

आपली प्रतिक्रिया द्या