परभणी जिल्ह्यातील येलदरी धरणाचे दोन दरवाजे पुन्हा उघडले

परभणी जिल्ह्यातील पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी धरणाचे आज सायंकाळी 5 वाजता एकूण 10 दरवाज्यांपैकी 2 उघडण्यात आले. त्याद्वारे 4200 क्यूसेक्स पाणी पूर्णा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. पाटबंधारे प्रकल्पाच्या अधिकार्‍यांनी गुरुवारी 10 दरवाजे उघडून मोठ्या प्रमाणात पाण्याच्या विसर्ग केला होता.

धरणातील पाणीसाठा आटोक्यात आल्यानंतर शुक्रवारी सदरील दरवाजे बंद केले होते. मात्र शनिवारी दुपारी पुन्हा पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाला सुरुवात झाल्यामुळे येलदरी धरणातून पुन्हा दोन दरवाजे उघडून पाणी सोडण्यात येत आहे. जलाशयातील पाण्याची आवक ओळखून पुन्हा दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. तसेच येलदरी जलविद्युत निर्मिती केंद्रातून 2 हजार 500 क्युसेक्स पाणी सोडल्या जात आहे. तेथून व दरवाजातून पूर्णा नदीच्या पात्रात 6700 क्युसेक्स एवढ्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान, पूर्णा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत असून काही ठिकाणी नदीस पुरही आला आहे. तसेच येलदरी धरणाखालील सिद्धेश्वर धरणातून सुद्धा विसर्ग सुरू असून सिद्धेश्वर धरणाचे 2 व 14 क्रमांकाचे दरवाजे 1 मीटरने उघडून 1456 क्यूसेक पाणी पूर्णा नदी पात्रात सोडले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या