दोन दिवस पावसाळी संकट; ‘यलो ऍलर्ट’ जारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुढील दोन दिवस राज्यावर पावसाळी संकट आहे. विदर्भासह राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यादृष्टीने यलो अॅलर्टही जारी करण्यात आला आहे. नागपूरसह संपूर्ण विदर्भात वादळी पाऊस सुरू आहे. बुधवारी सकाळी आणि दुपारी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. काटोल, नरखेड, रामटेक या जिह्यांमध्ये गारपीटही झाली. या अवकाळी संकटामुळे रब्बी पिकांचे नुकसान होईल या भीतीने शेतकरी चिंतेत पडले आहेत.