
बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर सदैव तत्पर असतात. ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जयदत्त क्षीरसागर यांच्यासोबत त्यांचे पुतणे योगेश क्षीरसागर हे देखील रस्त्यावर उतरले आहेत.
गेल्या तीन दिवसांपासून शहरात आणि ग्रामीण भागात शिवसेनेचे विचार घराघरात पोहचविण्यासाठी आणि नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी डॉ.योगेश क्षीरसागर यांनी जनसंपर्क अभियान सुरू केले आहे. योगेश हे वॉर्डनिहाय बैठका आणि गाठीभेटी घेत आहेत. ज्या भागाला त्यांनी भेट दिली आहे त्या भागातील कार्यकर्ते आणि नागरिकांचे व्हॉटसअॅप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. या नागरिकांच्या समस्यांचे निराकरण 24 तासाच्या आत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

























































