योगेश सोमण यांच्यावरील कारवाई मागे घ्या – फडणवीस

1568

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत गौरवोद्गार काढल्याबद्दल एखाद्या अधिकाऱ्याला थेट सक्तीच्या रजेवर पाठवणे योग्य नसून योगेश सोमण यांच्यावरील कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

सावरकर यांच्याबद्दल सोमण यांनी गौरवोद्गार काढल्यानंतर त्यांच्याविरुद्ध काँग्रेसप्रणीत ‘एनएसयूआय’ या संघटनेने आंदोलन केले आणि ते आंदोलन मागे घेण्यासाठी थेट सोमण यांनाच सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठ प्रशासनाने घेतला. हा निर्णय तमाम देशभक्तांना प्रचंड वेदना देणारा आहे. मध्य प्रदेशातसुद्धा एका प्राचार्यांना अशीच शिक्षा भोगावी लागते आहे हेही आपल्या कानावर आले असेलच. एकढेच नाही तर काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना धमक्यासुद्धा दिल्या आहेत. हा अन्यायकारक प्रकार तत्काळ थांबवावा आणि तसे निर्देश आपण मुंबई विद्यापीठाला द्यावेत अशी विनंती फडणवीस यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या