नांदेड तहसील कार्यालयाशेजारी युवकाचा खून, एक संशयित ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
murder

विजय जोशी । नांदेड

आज पहाटेच्या पूर्वी रात्री 1.30 वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयाच्या शेजारी असलेल्या रस्त्यावर एका 25 वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला आहे. वजिराबाद पोलीस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मध्यरात्री 1.30 च्या सुमारास तहसील कार्यालयाच्या शेजारी असलेल्या रस्त्यावर सुरजितसिंग मिलवाले या युवकाचा खून करण्यात आला. त्याच्या मानेवर, डोक्याच्या खाली तलवारीने अनेक वार केल्याच्या खुणा आढळल्या आहेत. या हल्ल्यामुळे सूरजितसिंगचा जागीच मृत्यू झाला. या संदर्भाने सुरजितसिंगचा भाऊ लक्कीसिंग मीलवाले याने दिलेल्या तक्रारीनुसार वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 233/2018 दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीत एका युवकाचे नाव मारेकरी म्हणून नमूद असल्याचे पोलीस उप अधीक्षक अभिजित फस्के यांनी सांगितले आहे. सर्व पुराव्यांचा सांगोपांग विचार करून पुढील कार्यवाही करणार असल्याचे फस्के म्हणाले.

वजिराबादचे पोलीस निरीक्षक संदीप शिवले यांच्या मार्गदर्शनात साहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे अधिक तपास करत आहेत. माहितीनुसार पोलिसांनी चौकशीसाठी एका युवकाला ताब्यात घेतले आहे. पुढील प्रक्रिया सुरू आहे.