महिलेचा व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महिलेचा आंघोळ करतानाच व्हिडीओ काढणाऱ्याला सांताक्रुझ पोलिसांनी अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वी तक्रारदार महिला ही पहाटे आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेली असताना आरोपीने तिचा व्हिडीओ काढला. हा प्रकार महिलेला समजताच तिने पतीला माहिती दिली. त्यानंतर महिलेने सांताक्रुझ पोलीस ठाण्यात तक्रार केली.

वरिष्ठ निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांच्या पथकातील उपनिरीक्षक कल्पना शिंदे यांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपीला काही तासांतच सांताक्रुझ परिसरातून ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर त्याने व्हिडीओ काढल्याची पोलिसांना कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून मोबाईल जप्त केला असून तो तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवला आहे.