मध्यस्थी करण्यासाठी गेला अन् जिवाला मुकला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दहिसर येथे तरुणाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. सागर सुगीरे असे मृताचे नाव आहे. त्याच्या हत्येप्रकरणी राम दुधानेला दहिसर पोलिसांनी अटक केली.

दहिसरच्या केतकीपाडा येथे राहणाऱ्या विवाहितेशी रामचे प्रेमसंबंध होते. हा प्रकार तिच्या पतीच्या लक्षात येताच त्याने तिला काही दिवसांसाठी गावी पाठवले होते. ती महिला गावावरून पुन्हा मुंबईत आल्यानंतर पती तिला दहिसर येथून मीरारोड येथे राहण्यास घेऊन गेला. मात्र तिचा पती कामावर गेल्यावर राम तिच्या घरी येत होता. ही माहिती सागरला समजली. तो रामची समजूत काढण्यासाठी गेला. त्यावरून रामने सागरला लाथाबुक्क्यानी मारहाण केली. त्यात सागर गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सागरच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी रामविरोधात गुन्हा नोंद करत रामला अटक केली. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.