
बँकॉकहून गांजा तस्करीप्रकरणी मुंबई विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी एका 21 वर्षीय तरुणीला अटक केली आहे. ट्रॉली बॅगेत हे अमली पदार्थ लपवून ठेवण्यात आले होते. सोनिया सिंग असे अटक केलेल्या तरुणीचे नाव असून तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तानुसार, स्पॉट प्रोफायलिंगच्या आधारे, बँकॉकहून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या सोनिया सिंगला अरायव्हल हॉलमधील ग्रीन चॅनेल ओलांडल्यानंतर अडवण्यात आले. अधिकाऱ्यांनी तिची ट्रॉली बॅग तपासली असता त्यात चॉकलेट्स, स्नॅक्स आणि कपडे आढळले. सखोल तपासणी केली असता, ट्रॉली बॅगेच्या आतील बाजूस काहीतरी असल्याचे दिसून आले. यानंतर अधिकाऱ्यांनी तपासले असता आत 2,409 ग्रॅम गांजा होता. त्यानंतर तिला अटक करण्यात आली.




























































