पुण्यात जाब विचारल्याने सराईताकडून तरुणावर कुर्‍हाडीने वार

प्रातिनिधीक फोटो

रात्री मोठ्याने गाणी वाजवित असल्यामुळे तरुणीने एकाला गाणी वाजवू नको असे सांगितले होते. त्याचा राग आल्यामुळे सराईताने तिला शिवीगाळ केली. त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणावर सराईताने कुर्‍हाडीने वार करुन गंभीररित्या जखमी केले. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही घटना काल येरवड्यातील आदर्शनगरमध्ये घडली.

संतोष उर्फ बंटी सुखदेव सिंग बदन असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अक्षयसिंग दिलबागसिंग शेरगिल (वय ३०) यांनी विश्रांतवाडी  पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षयसिंग आणि सराईत संतोष उर्फ बंटी येरवड्यातील आदर्शनगरचे रहिवासी आहेत. संतोष दररोज मोठ्याने गाणी वाजवित होता. त्यामुळे त्याचा त्रास होत असल्यामुळे अक्षयसिंगच्या बहिणीने त्याला गाणी न वाजविण्यास सांगितले. त्याचा राग आल्यामुळे संतोषने तिला शिवीगाळ केली. त्यामुळे त्याला जाब विचारण्यासाठी गेलेल्या अक्षयसिंगवर संतोषने कुर्‍हाडीने हल्ला करुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या