बांधाच्या वादातून तरुणावर कोयत्याने वार

जिल्हाधिकारी बदलले, पोलीस अधीक्षक बदलले, गुंडांच्या टोळय़ांना मकोका लावला… तरीही बीडमधील गुंडगिरी संपण्याचे नाव घेत नाहीय! बांधाच्या वादातून ‘तुझा संतोष देशमुख करू’ अशी धमकी देत एका तरुणावर कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

कैलास रस्त्यावर रक्तबंबाळ अवस्थेत पडल्याचे कळताच त्याचा भाऊ श्रीहरी सांगुळे याने धाव घेऊन त्याला बीड येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.