लोकलसमोर उडी मारून तरुणाची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकलसमोर उडी मारून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना कुर्ला रेल्वे स्थानक फलाट क्रमांक 1वर घडली. अपघातात मृत्यू झालेल्या त्या तरुणाची ओळख पटलेली नाही. घडल्याप्रकरणी कुर्ला रेल्वे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

दोन दिवसांपूर्वी तो दुपारी पावणेबाराच्या सुमारास कुर्ला रेल्वे स्थानक फलाट क्रमांक 1वर आला. ठाण्याला जाणारी लोकल कुर्ला स्थानकात येत असतानाच त्या तरुणाने लोकलसमोर उडी मारली. लोकलच्या धडकेने त्याचा जागीच मृत्यू झाला. याची माहिती समजताच कुर्ला रेल्वे पोलीस घटनास्थळी गेले. पोलिसांनी त्या तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. त्याची ओळख पटेल असे काहीच त्याच्याकडे सापडले नाही.