वीजेच्या धक्क्याने जळकोट येथे युवकाचा दुर्दैवी मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जळकोट (लातूर)

जळकोट-जांब राज्य महामार्गावर टेलिफोन एक्सचेंजसमोर असलेल्या गॅरेजमध्ये काम करत असताना विजेचा धक्का लागल्याने युवकाचा मृत्यू झाल आहे. अकबर बशीर शेख (१८) असं मृत तरुणाचं नाव आहे. बुधवार रात्री ही दुर्दैवी घटना घडली. ऐन रमजान महिन्यात ही घटना घडल्याने शेख परिवार शोकसागरात बुडाला आहे.

अकबर शेखतं राज्य महामार्गावर स्वत :चं गॅरेज होतं. गॅरेजमध्ये काम करत असताना ही घटना घडली. मात्र अकबरच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. वीजेचा धक्का लागून मृत्यू होण्याची जळकोट शहरात एका महिन्यातील ही दुसरी घटना घडली आहे.