खदानीत बुडून अल्पवयीन मुलांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । औसा

ऐन बैल पोळ्याच्या दिवशीच औसा तालुक्यातील उंबडगा (खु.)येथील एक अल्पवयीन तरुण मुलगा बैल धुण्यासाठी खदानीत गेला असता पाय घसरुन त्याचा दुदैवी अंत झाल्याची घटना घडली आहे.

दि. 9 सप्टेंबर रोजी उंबडगा येथील सुशांत शहाजीराव वाघमारे (वय 17) हा तरुण पोळ्याचा सण असल्याणे बैल धुण्यासाठी बदामे यांच्या खदानीत गेला असता बैल धुत असतांना त्याचा पाय घसरुन पाण्यात बुडून सुमारे अडीच वाजता मृत्यू झाला आहे.

मयत सुशांत हा गावातील एका शेतकऱ्याकडे कामाला होता. पण तो अल्पवयीन असल्याने दवाखान्यात गर्दी जमा झाली होती नातेवाईक व ज्यांच्या शेतात मयत सुशांत काम करायचा त्यांच्यात रात्री उशिरा पर्यंत तडजोड न झाल्याने नातेवाईकांनी राञी उशीरा पर्यंत मृत्युदेह ताब्यात घेतला नाही. रात्री उशीरा पर्यंत औसा पोलिसांत गुन्हा नोंद झालेला नव्हता.