
सामना प्रतिनिधी । चंद्रपूर
चंद्रपूर शहरातील गंजवार्ड येथील शेकडो युवकांचा मोठ्या उत्साहात शिवसेनेत प्रवेश केला. शहरातील युवकांमध्ये सामाजिक, शैक्षणिक तसेच राजकिय क्षेत्रात कार्य करण्याचा एक उत्साह निर्माण करून शिवसेना शहर (महानगर) प्रमुख मनोजभाऊ पाल यांच्या नेतृत्वात चंद्रपूर शहर येथील मध्यभागी स्थित गंजवार्ड येथील शेकडो युवकांचा भगवा दुपट्टा व शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश करण्यात आला.
शिवसेना शहर (महानगर) प्रमुख मनोजभाऊ पाल यांनी उपस्थित युवकांसह बैठक घेत शिवसेनेचे ध्येय, धोरण तसेच शिवसेनेचे विचार यांची जाणिव करून देत शिवसेनेची बांधिलकी जपत एकनिष्ठ राहून प्रभागातील समस्या सोडविण्यास कटिबध्द राहण्याचे आवाहन केले. यावेळी माजी शिवसेना जिल्हाप्रमुख,सतिशभाऊ भिवगडे, भारतीय कामगार सेना जिल्हाप्रमुख जयदिपभाऊ रोडे, माजी तालुकाप्रमुख शालिकभाऊ फाले, उपजिल्हा महिला संघटिका, मायाताई पटले, शहर महिला संघटिका वर्षाताई कोठेकर तसेच शेकडो नवनिर्वाचित शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.






























































