कश्मीरमध्ये सैन्यभरतीसाठी झुंबड; दोन हजारांहून अधिक युवकांची गर्दी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । जम्मू

हिंदुस्थानी लष्करात भरती होण्यासाठी जम्मू-कश्मीरातील तरुणांची अक्षरशः झुंबड उडाल्याचे चित्र पहायला मिळाले. 111 जागांसाठी किमान दोन हजार तरुण भरती प्रक्रियेत सहभागी झाले आहेत. लष्करात भरती होऊन देशसेवा करण्यामागे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची प्रेरणा आहे, असे तरुणांनी या वेळी सांगितले.

पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. हिंदुस्थानने ‘हवाई स्ट्राईक’ करून पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला. मात्र पाकडय़ांची खुमखुमी कमी झालेली नाही. सीमेवर रोज शस्त्र्ासंधीचे उल्लंघन सुरू आहे. कश्मीर खोऱयात दहशतवादी हल्लेही थांबलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर बारामुल्ला येथे 181 इन्फंट्री बटालियनच्या मुख्यालयात सैन्य भरती सुरू आहे. 111 जवानांची भरती केली जाणार आहे. यासाठी कश्मिरी तरुणांनी रांगा लावल्या. लष्करात भरती होण्यासाठीचा उत्साह या तरुणांमध्ये दिसत आहे.

हवाईदलाचे विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तानी सैन्याने पकडले; मात्र, अभिनंदन हे सहीसलामत मायदेशी परत आले. अभिनंदन यांचे शौर्य आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. तरुणांमध्ये देशसेवा करण्याची आशा निर्माण झाली आहे.
-मुबस्सिर अली (कश्मिरी तरुण)