चक्रीवादळामुळे अनाथ झालेल्या मुलांच्या शिक्षणाचा भार युवासेनेने उचलला; पदवीपर्यंत मिळणार विनामूल्य शिक्षण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 ‘तौकते’ चक्रीवादळात अंगावर झाड कोसळून वरळी बीडीडी चाळीतील संगीता खरात यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूमुळे त्यांची दोन्ही मुले अनाथ झाली. युवासेना त्या मुलांच्या मदतीला धावून गेली. त्यांच्या शिक्षणाचा भार उचलला. या दोन्ही मुलांना पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा सर्व खर्च युवासेना करणार आहे.

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख व राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेवरून युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी वरळीतील युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून खरात बंधूंना तातडीची आर्थिक मदत पोहोचवली. तसेच त्यांना पदवीपर्यंत कृष्णा टय़ुटोरियल्स या क्लासमध्ये विनामूल्य कोचिंग शिकवणी घेता येईल असे पत्रही प्रदान केले. त्याप्रसंगी युवा सेनेचे विभाग अधिकारी संकेत सावंत, युवती विभाग अधिकारी आकर्षिका पाटील, शाखाप्रमुख विजय भणगे व सुजाता सावंत, जीवन जाधव, नेहा वर्मा उपस्थित होते.