
इंडियन क्रिकेट टीमचा ऑफ स्पिनर गोलंदाज हरभजन सिंह आणि माजी ऑल राऊंडर खेळाडू युवराज सिंह यांच्या घट्ट मैत्रीबद्दल सर्वांनाच ठाऊक आहे. अनेकदा सोशल मीडियावरूनदेखील ते एकमेकांची मजामस्ती करताना दिसतात. नुकताच हरभजनने सोशल मीडियावर स्केटबोर्डसोबत स्टायलिश फोटो शेयर केला असून युवीने त्याला ट्रोल केले आहे.
हरभजनने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटकर स्केटबोर्डसोबत फोटो शेयर केला आहे. त्यासोबत ’एक अजीब सी दौड है ये जिंदगी, जीत जाओ तो कई अपने पीछे छूट जाते हैं और हार जाओ तो अपने ही पीछे छोड जाते हैं!’ अशी कॅप्शन त्याने दिली आहे. हरभजनच्या हातातील स्केटबोर्ड पाहून ’पाजी थोडी स्केटिंग करून दाखव’ अशी मजेशीर कमेंट युवीने केली आहे. त्यावर ’चल आपण दोघे एकत्र करू’ असा रिप्लाय हरभजनने दिला आहे. दरम्यान, इरफान खान याने देखील ’वाह ! शायर साहब’ अशी कमेंट या पोस्टवर दिली


























































