श्रीलंका स्फोटात झाकीर नाईकचाही हात ?

सामना ऑनलाईन । कोलंबो

श्रीलंकेची राजधानी कोलंबोत रविवारी झालेल्या साखळी ब़ॉम्बस्फोटात 350 लोकांना जीव गमवावा लागला तर 500 हून अधिक जण जखमी झाले. या हल्ल्यात आत्मघाती बॉम्बस्फोट घडविणारा दहशतवादी जहरान हाशिम याच्यावर वादग्रस्त इस्लामिक धर्मप्रचारक झाकीर नाईक याच्या भाषणांचा प्रभाव असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या स्फोटांमागे झाकीर नाईकचा देखील हात आहे का अशी चर्चा सध्या सुरू आहे.

जहरान हाशिम याने कोलोंबोतील शांगरिला हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट घडवला होता. जहरान हाशिम हा मौलवी म्हणून कार्यरत होता. त्याला झाकिर नाईकची भाषणं ऐकायला आवडायची. काही दिवसांपूर्वी हाशिमने एक व्हिडीओ युट्यूबवर शेअर केला होता. त्यात त्याने ‘श्रीलंकेतील मुसलमान झाकीर नाईक यांच्यासाठी काय करू शकतात?’, असा सवाल केला होता.

2016 मध्ये हिंदुस्थान सरकारने झाकीर नाईक आणि त्याच्या संघटनेवर 5 वर्षांसाठी बंदी घातली आहे. नाईक सध्या मलेशियात लपून बसला आहे. काही वर्षांपूर्वी बांगलादेशमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या हल्लेखोरांकडे नाईक याची चिथावणीखोर भाषणे सापडली होती