
इस्लामिक धर्मप्रचारक झाकीर नाईकविरुद्ध पीएमएलए न्यायालयाने आज नव्याने अजामीनपात्र वॉरंट जारी केले. सध्या मलेशिया येथे लपलेला नाईक हा मनी लॉण्डरिंग प्रकरणात पोलिसांना हवा आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वीही वॉरंट बजावले होते; परंतु त्याला कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने पीएमएलए न्यायालयाने आज पुन्हा एकदा हे अजामीनपात्र वॉरंट बजावले. झाकीर नाईकविरुद्ध 2016 साली मनी लॉण्डरिंगप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याची चौकशी करणाऱया ईडीने झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणासाठी मलेशियाशी बोलणी सुरू केली आहे. त्यामुळे हादरलेल्या नाईकने हिंदुस्थानातील न्यायालयात हजर राहण्यासाठी 2 महिन्यांचा वेळ मागितला आहे.



























































