महागाईनं कंबरडं मोडलेल्यांना झंडूबाम व सुई दोऱ्याचे वाटप

सामना प्रतिनिधी । लातूर

काँग्रेस पक्षाच्या वतीने सोमवारी देशभर हिंदुस्थान बंद पुकारण्यात आला होता. नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांनी पुढाकार घेत लातुरमध्ये अभिनव आंदोलन केले. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरात भरमसाठ दरवाढ करुन सामान्य नागरीकांचे कंबरडं मोडल्याने नागरीकांना झंडू बामचे वाटप केले. तसेच खिसेकापू सरकारने दरवाढ करुन सामान्य नागरीकांचे खिसे कापल्याचा आरोप करीत गोजमगुंडे यांनी नागरीकांना सुई दोरा वाटप करुन सर्वांचेच लक्ष वेधले.

या कल्पक आंदोलनास नागरीकही सकारात्मक प्रतिसाद देताना दिसून आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी निर्देशने केली. यावेळी नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे, डॉ. फरजाना बागवान, गौरव काथवटे, सौ.अंकुशे, कुणाल श्रंगारे, सुरज राजे, जफरनाना, मुस्तीम सय्यद, यशपाल कांबळे, ओमकार सोनवणे, कुणाल वागज, युनूस शेख, सलीम घंटे, मनसेचे अजय कलशेट्टी, राम गोरड, प्रविण सुर्यवंशी, अभिजीत साबणे, विशाल चामे, अजय अपसिंगे, जाफर शेख, दिनेश रायकोड, मनोज रुकमे, खाजामिया शेख, संदीप मोहीते, मुरारी पारीख, अजमल शेख, अजमल शेख, अतिक शेख, शंभुराजे पवार, ताहेर शेख, अजीज बागवान, राम चलवाड, जयकुमार ढगे, खय्युम शेख, मुस्तकीम पटेल, आबेद शेख, रहेमान शेख, करण कांबळे, काकासाहेब धुमाळ, रोहीत काळे, युसूफ बाटलीवाला, बंडू बारस्कर, अमजद पठाण, राहूल धोत्रे, संजय क्षीरसागर, प्रथमेश स्वामी, संतोष पुरी, अजहर शेख, शादाब शेख, सुरज चलवाड, गोविंद वाघमारे, तबरेज तांबोळी, मयुर भोसले, शेख मुजीब, कमलेश भालेराव, शंकर मोरे, संगमेश्वर स्वामी, सोपान काळे, बालाजी झोडपे इत्यादी उपस्थित होते.