
शेअर बाजारातील गुंतवणूक धोक्याची मानली जात असली तरी अभ्यास करून आणि आगामी परिस्थितीचा वेध केलेली गुंतवणूक फायद्याची ठरते. तसेच दीर्घ मुदतीसाठी चांगल्या शेअरमध्ये केलेल्या गुंतवणुकीतूनही चांगला फायदा होतो. तसेच सध्या फार्मा आणि आयटी क्षेत्रातील कंपन्या तेजीत असल्याने त्यांचे शेअरही वधारले आहेत. एका आयटी कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांना वर्षभरतच दुपटीपेक्षा जास्त फायदा झाला आहे. वर्षभरात या शेअरमध्ये 145 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
आयटी क्षेत्रातील Zensar Techologies च्या शेअरने गुतंवणूकदारांना वर्षभरात जबरदस्त नफा मिळवून दिला आहे. गेल्या वर्षी 3 ऑगस्ट 2020 रोजी या कंपनीचा शेअर 175.70 रुपये होता. ते वर्षभरातच 430 रुपयांपर्यंत पोहचला आहे. या शेअरच्या किंमतीत दुपटीपेक्षा जास्त वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना वर्षभरात 145 टक्क्यांपेक्षा जास्त रिटन्स मिळाले आहेत.
या कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या वर्षी 5 लाख गुतंवणूक करणाऱ्यांचे वर्षभरात 5 लाखांचे 12.23 लाख झाले आहेत. त्यामुळे या कंपनीत गुंतवणूक करणारे खुशीत आहेत. Zensar Techologies कंपनीचे मार्केट कॅपिटलाइजेशन 9,604.61 कोटी रुपये झाले आहे. त्याचप्रमाणे बाजारातही या कंपनीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे जानेवारी ते मार्च 2021 या तिमाहीत कंपनीला 101 रुपयांचा नफा झाला आहे. या कपंनीवर कर्जाचे ओझे नसल्याने तसेच याची कामगिरी चांगली असल्याने आगामी काळात याचे शेअर आणखी वधारतील, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.


























































