गेल्या दोन वर्षात रेल्वे अपघातात किती मृत्यू झाले? सरकारने दिली माहिती

गेल्या दोन वर्षात रेल्वे अपघातात किती मृत्यू झाले याबाबत सरकारने माहिती दिली आहे. 2016-21 या पाच वर्षात 313 रेल्वे अपघात झाले. या अपघातात 239 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. परंतु गेल्या दोन वर्षात रेल्वे अपघातात एकही मृत्यू झाला नसल्याची माहिती सरकारने दिली आहे.

भाजप नेते खासदार सुशील मोदी यांनी राज्यसभेत ही माहिती दिली आहे. मोदी म्हणाले की देशात रेल्वेने प्रवशांना चांगली सुविधा आणि योग्य सुरक्षा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे दोन वर्षात रेल्वे अपघातात एकही प्रवाशाचा मृत्यू झाला नाही. न्यु इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे.

2016-21 दरम्यान 313 रेल्वेचे अपघात झाले. त्यात 239 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 2019-20 आणि 2020-21 या वर्षात झालेल्या एकाही अपघातात मृत्यूची नोंद नाही.

2016-17 या वर्षात 104 रेल्वे अपघात झाले आहेत. तर 2017-18 या वर्षात रेल्वे अपघातांमध्ये घट होऊन ती संख्या 73 वर आली आहे. तर 2018-19 मध्ये 59, 2019-20 मध्ये 55 आणि 2020-21 मध्ये 22 रेल्वे अपघात झाल्याचे मोदी यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या