बॉक्स ऑफिसवर महिलांचा बोलबाला; झिम्मा 2 यशस्वी घोडदौड, सात कोटी कमावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

काही दिवसांपूर्वी आलेल्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 75 कोटींची कमाई केली. त्यानंतर गेल्या आठवडय़ात प्रदर्शित झालेला ‘झिम्मा 2’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. ‘झिम्मा 2’ ने पहिल्या आठवडय़ात सात कोटींच्या कमाईचा आकडा गाठला आहे. त्यामुळे मराठी इंडस्ट्रीत महिलाप्रधान चित्रपटांचा बोलबाला दिसून येत आहे.
‘झिम्मा 2’ ला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने आता दुसऱया आठवडय़ात यशस्वी पदार्पण केले आहे. प्रदर्शनापूर्वी त्याच्या टिझर, ट्रेलर व गाण्याने चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढवली होती. परिणामी चित्रपटाने सात दिवसांत जळपास 7.71 कोटींची कमाई केलेली पाहायला मिळत आहे.

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा 2’ मध्ये कलाकारांची मांदियाळी आहे. अभिनेत्री सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, निर्मिती सावंत, क्षिती जोग, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे, सायली संजीव व अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.