नदीत बैलगाडी बुडाली, एका बैलाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पिंपरखेड

जालना जिल्ह्यातील व घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेड येथील एका शेतकऱ्याचा बैल पाण्यात बुडून मृत्यू पावल्याने तेथील शिवसैनिकांनी शेतकऱ्याला ५ हजारांची मदत केली आहे.

घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेड बु येथील नारोळा नदीवरील पांढरी वस्ती येथील अभिमान कराड हे शेतकरी बैलाला पाणी पाजण्यासाठी नारोला नदीवर टायर गाडीसह गेले. दरम्यान जेसीबीने खोलीकरण झाल्यामुळे कच्च्या मातीतुन बैलाचे पाय घसरल्याने बैलगाडीसह शेतकरी पाण्यात बुडाला. त्यानंतर त्यांच्या आवाजाने परीसरातील शेतकरी जमा झाले आणि त्यांच्या अथक प्रयत्नाने शेतकरी व बैलांना वर काढण्यात यश आले.परंतु बराच वेळ बैल पाण्यात राहिल्यामुळे बैलांच्या शरीरात पाणी गेल्याने बैलाचा मृत्यू झाला.

या घटनेची दखल देऊन पिंपरखेड येथील शिवसेनेचे अनिल सानप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी २२ मार्च रोजी संध्याकाळी शेतकऱ्याची भेट घेऊन त्यांना आधार देऊन सांत्वन करत दवाखान्यात उपचारासाठी मदत म्हणून रोख स्वरुपात ५ हजारांची मदत केली.

यावेळी पिंपरखेड शहरप्रमुख गणेश सिरसाठ, धर्मराज आंधळे, ग्रा. प. सदस्य सोमनाथ घुगे, भागवत शिरसाठ, संतोष खंदारे, संजय नागरे, सिद्धु नागरगोजे, दत्ता नागरगोजे, बाबा नागरगोजे, भरत भांगे, रमेश डोईफोडे, सिराम मिसाळ
यांच्यासह शिवसैनिकांची उपस्थिती होती.