
old people from ramadhan gets emotional by remembering meenataai thackeray
तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या आठवणींने ‘रमाधाम’ गहिवरून गेले होते. येथील आजी-आजोबांनी एकत्र येऊन त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी माँसाहेबांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आयोजित केलेल्या भजन, कीर्तन आणि भक्तिगीतांचे सूर रमाधाममध्ये उमटले.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुढाकाराने तसेच माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या संकल्पनेतून रमाधाम वृद्धाश्रम साकारला आहे. मनमोहक हिरवाई, निसर्गरम्य वातावरण तसेच आजी-आजोबांची मोठय़ा ममतेने करण्यात येत असलेली सेवा यामुळे ही वास्तू पवित्र झाली आहे. मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त रमाधामचे अध्यक्ष चंदूमामा वैद्य आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते बबन पाटील यांनी माँसाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. चंदूमामा यांनी उपस्थितांना माँसाहेबांच्या आठवणी सांगितल्या. यावेळी युवासेना तळोजा चिटणीस युवराज पैलास पाटील, उपजिल्हा संघटक अनिता पाटील, सुविधा विचारे, छगन राठोड आदी उपस्थित होते.
मुंबई, ठाण्यात विविध ठिकाणी माँसाहेबांना अभिवादन
स्वर्गीय माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमीत्त शिवसेना शाखा पंतनगर येथे माँसाहेबांच्या स्मृतीस आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी शिवसेना उपविभागप्रमुख अजित गुजर, प्रकाश वाणी, शाखाप्रमुख विशाल चावक, महाराष्ट्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सेनेचे सचिव सचिन भांगे, शाखा संघटक चंद्रकांत हळदणकर, विधानसभा संघटिका नीलम कदम, ग्राहक संरक्षण कक्षाचे रमेश सावंत, वसंत पाटील, निकम व इतर उपस्थित होते.
दादरच्या सेनापती बापट रोड येथे स्व. माँसाहेब मीनाताई ठाकरे फुलबाजार व्यापारी मंडळाने येथील तुळशी वृंदावनाच्या स्मृती स्तंभास फुलांची आकर्षक सजावट केली. यावेळी शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, आमदार महेश सावंत, यशवंत विचले, साईश माने, अविराज पवार, मनोज पुंडे, अजय काwसाले, प्रकाश बुचके, मच्छिंद्र शेलार, रामदास भोसले, तुषार भोसले, अजय खाडे, गणेश शेरकर, प्रवीण पुंडे, बापू लोके, राजेंद्र पवार, चंद्रकांत हुलवले, राजेंद्र बोचरे, विरेंद्र जाचक, रामदास लोखंडे उपस्थित होते.
ठाण्यातील पॅसलमील नाका येथे माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे चौकात माँसाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. शिवसेना नेते, माजी खासदार राजन विचारे यांच्या हस्ते गोरगरीबांना फळवाटप करण्यात आले. याप्रसंगी उप जिल्हाप्रमुख प्रदीप शिंदे, शहर समन्वयक संजय तरे, शहरप्रमुख अनिष गाढवे, उप शहरप्रमुख सचिन चव्हाण, शहर समन्वयक संजय तरे, उप जिल्हासंघटक महेश्वरी तरे, विभाग संघटक वैशाली मोरे, विद्या कदम, संतोष दंत, मयूर पैलकर, राजश्री सुर्वे, कविता नार्वेकर, सागर माने, विशाल जयसिंगपुरे, अनुराधा चव्हाण, स्मिता सपकाळ, कल्पना कदम, नामदेव जगदाळे, नीलेश कदम, संतोष गवई, सुनील भोईर, राजू पवार, जितेंद्र राणे, इंद्रजित चौहान उपस्थित होते.
वसईतील वालीव शिवसेना शाखेत माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांना शिवसैनिकांनी अभिवादन केले. यावेळी तालुकाप्रमुख काकासाहेब मोटे, राधेश्याम पाठक, शाखाप्रमुख जगदीश धनगर, उपविभागप्रमुख जया दवडे, शाखाप्रमुख सुकिशन काशिदे, विजय कोलते, सुनिल पवार, सुधाकर भुवड ,महिला आघाडीच्या प्रमिला कामत , सुरेखा धनगर, संध्या आंग्रे, गीतांजली फुलारे, रेखा पाटील, जागृती धनगर, शितल नवले, प्रिया माळवी उपस्थित होते.