
मित्राला घरी सोडण्यासाठी जाणाऱया तीन मित्रांवर काळाने घाला घातल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी शिवारात घडली आहे. रविवारी मध्यरात्री एक वाजता उसाच्या ट्रॉलीला कार धडकल्याने हा अपघात झाला आहे. एकाच वेळी तीन मित्रांनी प्राण गमावल्याच्या घटनेने श्रीगोंदा तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
राहुल सुरेश आळेकर (वय 22, रा. श्रीगोंदा), केशव सायकर (वय 22, रा. काष्टी) व आकाश रावसाहेब खेतमाळीस (वय 18, रा. श्रीगोंदा) अशी मृतांची नावे आहेत. आकाश व राहुल हे केशवला घरी सोडण्यासाठी जात होते.



























































