असुरक्षित लैंगिक संबंध; दहा वर्षांत 17 लाख एड्सग्रस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे गेल्या दहा वर्षांत 17 लाख जणांना एड्सची बाधा झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे गेल्या दहा वर्षांत एचआयव्ही संक्रमित लोकांच्या संख्येत घट झाली आहे. 2011-12मध्ये असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे एचआयव्ही बाधित झालेल्यांची संख्या 2.4 लाख इतकी होती, तर 2020-21मध्ये ती घटून 85 हजार 268 इतकी झाली आहे.

मध्य प्रदेशातील सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर गौर यांनी आरटीआय अंतर्गत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेने ही माहिती दिली आहे. राज्यांबद्दल बोलायचे झाले तर आंध्र प्रदेशमध्ये सर्वाधिक 3,18,814, महाराष्ट्रात 2,84,577, कर्नाटकात 2,12,982, तामिळनाडूमध्ये 1,16,536, उत्तर प्रदेशात 1,10,911 आणि गुजरातमध्ये 87,440 प्रकरणे नोंदवली गेली.