
जम्मू कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील झदुरा गावात शनिवारी पहाटे झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. तर या चकमकीत एक जवान शहीद झाला आहे. गेल्या 24 तासातली जम्मू कश्मीरमधील ही दुसरी चकमक आहे.
#UPDATE: One soldier who was critically injured has succumbed to his injuries in an encounter that started last night in Zadoora area of Pulwama. Joint operation in progress: PRO Defence, Srinagar https://t.co/dX8P0q1ltT
— ANI (@ANI) August 29, 2020
झदुरा गावातील एका घरात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर जम्मू कश्मीर पोलीस व लष्कराने एकत्रितपणे या भागात शोध मोहिम सुरू केली. सुरुवातीला दहशतवाद्यांना शरण येण्याचे आवाहन केले. मात्र दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या वेळी झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला तर तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. घटनास्थळावरून एक एके 47 रायफल व 2 पिस्तूल जप्त करण्यात आल्या आहेत. अद्याप या भागात शोध मोहिम सुरू आहे, ‘असे लष्कराचे प्रवक्ते कर्नल राजेश कालीया यांनी सांगितले.
गेल्या 24 तासात जम्मू कश्मीरमध्ये दोन चकमक झाल्या. शुक्रवारी जम्मू कश्मीरमधील शोपियन जिल्ह्यातील किरू गावात झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्म करण्यात आला तर एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली.






























































