
अर्थसंकल्पापूर्वी देशाच्या आर्थिक धोरणावर सल्लामसलतीसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील 12 पेक्षा जास्त केंद्रीय व्यापारी संघटनांना केवळ 75 मिनिटांचा वेळ दिला आहे. त्यामुळे हा तर विनोद असल्याचे म्हणत संतप्त झालेल्या केंद्रीय व्यापार संघटनांच्या संयुक्त मंचाने अर्थमंत्री सीतारामन यांच्यासोबत उद्या 28 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अर्थसंकल्पापूर्वीच्या ऑनलाईन बैठकीवर बहिष्कार घातला आहे. अर्थसंकल्पापूर्वी होणाऱ्या या बैठकीत विविध क्षेत्रांमधील प्रतिनिधी आपल्या मागण्या अर्थमंत्र्यांपुढे मांडत असतात.



























































