लोणी येथे एक रुपयात 10 लिटर आंघोळीचे गरम पाणी, लोणी ग्रामस्थांची गरम पाण्याची सोय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । उदगीर 

लोणी ग्रामपंचायतीचे सरपंच माधव पाटील झाल्यापासून अनेक लोकपयोगीं योजना राबवण्यात आल्या. एक रुपया मध्ये दहा लिटर गरम पाणी देण्याचा उपक्रम ग्रामपंचायतीने सुरू केला असून लातूर जिल्ह्यातील  ही पहीली ग्रामपंचायत ठरली आहे. लातूर जिल्ह्यात सर्वप्रथम  5 रुपयात 20 लिटर फिल्टर पाणी देण्याचा उपक्रमही या ग्रामपंचायतीने राबवलेला होता. गावात सी सी टी व्ही कॅमेरे, 90% गावातील रस्ते पेव्हर ब्लॉक बसवून पूर्ण गावात व चौकाचौकात एल ई डी बलब बसवून प्रकाशमय गाव झाले आहे.

एक जानेवारी 2016 पासून गावात जन्मलेल्या मुलीच्या नावे 1एक लाख रुपयांचे फिक्स डिपॉजिट, ग्रामपंचयातीची मूळ गाव वाल्याकडून आतापर्यंत कसलीच वसुली नाही, गावातील लोकांना 500 नारळाच्या झाडाचे वाटप, नवीन पाच सिमेंट बंधारे व तीन दुरुस्त बंधारे केले आहेत. एक रुपया लोकवाटा जमा न करता दोन वेळेस जलयुक्तचे काम पूर्ण करून घेतले, अर्ध्या नाल्यावर  फरशी टाकून झाकण्यात आली, शिल्लक असलेल्या खूप ठिकाणी सिमेंट काँक्रेट रस्ते करण्यात आले. अशा अनेक योजनेबरोबर आज एक गाववाल्यासाठी गरम पाण्याची सुविधा या योजनेचे उद्घाटन लातूर जिल्हा परिषदेचे डेप्युटी सी ओ आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले आहे.गावात तीन ठिकाणी गरम पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे तिथूनच लोकांनी पाणी घेऊन जावयाचे आहे. गावात आणखीन काही योजना राबवण्यात आल्या असून त्याचे उद्घाटन बाकी आहे.

ग्रामस्थांना गरम पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील लोणी ग्रामपंचायतीने छान उपक्रम राबवला असून सध्याच्या थंडीच्या दिवसांमध्ये या ग्रामस्थांची मोठी झालेली आहे. या कार्यक्रमासाठी सरपंच माधव पाटील, ग्रामविकास अधिकारी सीताराम राठोड, उपसरपंच सोपान फड,सदस्य गणीसाब शेख उपस्थित होते.