ओमायक्रॉनविरोधात रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात ‘हे’ पदार्थ…थंडीपासूनही होतो बचाव…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात ओमायक्रॉनचा फैलाव वाढत आहे. देशात 1500 पेक्षा जास्त ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे आरोग्य यंत्रणेने कोरोना निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन जनतेला केले आहे. तसेच डॉक्टरांनीही रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पदार्थांचे सेवन करण्याचे आवाहन केले आहे. थंडीच्या काळात थंडीपासून बचाव होण्यासह रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या काही पदार्थांचे सेवन केल्यास त्याचा फायदा होई शकतो. त्यातील या पदार्थांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

तूप – आयुर्वेदात तुपाचे अनेक औषधी गुणधर्म सांगितले आहेत. तूप सहजतेच पचणारे असून थंडीच्या काळात शरीराला आवश्यक ऊब आणि स्निग्घता त्यातून मिळते. तसेच त्यातून शरीराला ऊर्जाही मिळते. त्याचप्रमाणे तूपामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. तसेच थंडीत त्वजा कोरडी होण्यापासूनही शरीराचा बचाव होतो. तूप चपाती, भात,भाजी किंवा डाळीसोबतही घेता येते.

रताळे – रताळ्यांमध्ये विटामीन ए, पोटॅशियम आणि अनेक पोषक तत्वे असतात. त्यामुळे कफविकारावर ते उपयुक्त आहे. तसेच त्यातील विटामीन आणि पोषक तत्वांमुळे रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. रताळ्याचा एखादा तुकडा दिवसभरातील बीटा कॅरोटीनची भरपाई करण्यास पुरेसा असते, असे तज्ज्ञांनी सांगितले. रताळे शिजवून खाता येतात किंवा दूधासोबतही ते घेता येतात.

आवळे – आवळ्यामध्ये विटामीन सी भरपूर प्रमाणात असते. तसेच थंडीच्या दिवसात विविध रोगांपासून बचाव करण्यासही ते उपयुक्त आहे. आवळ्याचा मोरावळा,लोणचे, ज्यूस, चटणी आणि चूर्ण बनवून त्याचा वापर करता येतो. त्यातील पोषक तत्वांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढत असून शरीरालाही फायदा होतो.

खजूर – खजूराचा उपयोग विविध प्रकारे करण्यात येतो. त्यात असलेल्या विटामीन, मिनरल आणि फायबरमुळे शरीराला पोषक द्रव्ये मिळतात. खजूरात असलेल्या कॅल्शियममुळे हाडे आणि दातांना मजबुती मिळते. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यातही खजूराची महत्त्वाची भूमिका असते, असे तज्ज्ञांनी सांगितले.

गूळ – विविध काढ्यांमध्ये गूळ टाकून त्याचे सेवन केल्याने काढ्याचा फायदा मिळण्यासह रोगप्रतिकारक शक्ती वाढत असल्याचे आयुष् मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच हिवाळ्यात होणाऱ्या सर्दीपडसापासूनही गूळाचे सेवन केल्यास फायदा होतो. थंडीत पसरणाऱ्या विविध सोथरोगांपासून बचाव होण्यासह रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी गुळाचे सेवन करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.

बाजरी – थंडीच्या काळात बाजरीच्या सेवनाने आरोग्याला फायदा होतो. बाजरीतील पोषक तत्वांमुळे मासंपेशी बळकट होतात आणि शरीराला आवश्यक उर्जाही मिळते. थंडीच्या काळात बाजरी आणि नाचणीचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

आले – आल्याचे सेवन केल्यास त्वजाविकारांपासून सुटका होण्यासाठी मदत होते. पचनाची समस्या,मळनळणे यावरही आल्याचा चांगला उफयोग होतो.तसेच आल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

आंबट फळे – मोसंबी, संत्रे ,लिंबू यासारख्या फळांचे हिवाळ्यात सेवन केल्याने आरोग्याला फायदा होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. या फळांमध्ये विटामीन सी विपुल प्रमाणात असते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. या पदार्थांचे सेवन केल्यास थंडीच्या काळात होणाऱ्या विविध रोगांपासून बचाव होतो. तसेच ओमायक्रॉनविरोधात रोगप्रतिकारक शक्ती वाढत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.