शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनस्थळाची 14 जूनला घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
100th-akhil-bharatiya-marathi-sahitya-sammelan-venue-announcement-on-june-14

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळाची 14 जून रोजी घोषणा होणार आहे. या संमेलनासाठी सहसंयोजक म्हणून लोकहितवादी यांनी स्थापन केलेले पुणे नगर वाचन मंदिर आणि पुणे पुस्तक महोत्सव या दोन संस्था इच्छुक आहेत.

महामंडळाच्या रविवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी पत्रकार परिषदेत दिली. साहित्य महामंडळाच्या प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर या वेळी उपस्थित होते.

यावेळी सोमण, महाळंक आणि निफाडकर यांनी साहित्य महामंडळाचे पदाधिकारी म्हणून सूत्रे स्वीकारली.