शिवसेनेच्या वतीने सलग 106 वे रक्तदान शिबीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे 17 नोव्हेंबर 2012 रोजी महानिर्वाण झाल्यानंतर वरळीतील शिवसेना शाखेत प्रत्येक महिन्याच्या 17 तारखेला रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. त्यानुसार रविवार 17 ऑक्टोबर रोजी सलग 106 वे रक्तदान शिबिर सकाळी 9 ते 12 या वेळेत वरळी नाका येथील शिवसेना शाखेत आयोजित करण्यात आले आहे. इच्छुक रक्तदात्यांनी 9821581860 या क्रमांकावर आयोजक नगरसेवक अरविंद भोसले यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.