
तमिळनाडूतील शिवगंगा जिल्ह्यामध्ये भीषण अपघात झाला. रविवारी सायंकाळी केम्मनगुंडी जवळ दोन सरकारी बस एकमेकांना धडकल्या. या अपघातात आत्तापर्यत 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 60 हून अधिक लोक जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. हा अपघात तिरुपत्तूर भागातील पिल्लैयारपट्टीपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर झाला.
Tamil Nadu: Death toll rises to 11 in Sivaganga bus collision
Read @ANI Story | https://t.co/m3iNmrHF7M#SivagangaAccident #BusCollision #DeathToll pic.twitter.com/yC2w9OjIO5
— ANI Digital (@ani_digital) November 30, 2025
दरम्यान या भीषण अपघाताची माहिती मिळताच परिसरातील इतर लोकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले आणि वाहनांमध्ये अडकलेल्या अनेक प्रवाशांना बाहेर काढण्यास मदत केली. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.
अपघातग्रस्त बसपैकी एक बस तिरुपूरहून कारैकुडीकडे जात होती, तर दुसरी कारैकुडीहून दिंडीगुल जिल्ह्याकडे निघाली होती. यावेळी दोन्ही बसची धडत झाली. या भीषण अपघातात एका चिमुकलीसह 11 जणांचा मृत्यू झाला आहे.
तमिळनाडूमध्ये आठवड्याभरात सरकारी आणि खासगी बसेसच्या अपघाताची ही दुसरी मोठी घटना आहे. गेल्या आठवड्यात, तेनकासी जिल्ह्यामध्ये दोन खासगी बसेस एकमेकांवर आदळल्याने सहा प्रवासी ठार झाले होते.


























































