
एसटी महामंडळाने संपकरी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचा सपाटा सुरूच ठेवला असून सोमवारी तब्बल 110 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे.
त्यामुळे एकूण बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या आता 925 इतकी झाली आहे. तसेच आतापर्यंत एसटी महामंडळाने 11,024 कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहनमंत्री अॅड. अनिल परब यांनी 22 आणि 23 डिसेंबर रोजी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याची एक संधी दिली होती.
कर्मचाऱ्यांनी परतल्यास त्यांच्यावरील सर्व प्रकारची कारवाई मागे घेण्यात येणार होती. परंतु कामगारांचा संप सुरूच आहे. दरम्यान, राज्यातील 250पैकी 170 आगारांतील वाहतूक सुरू करण्यात यश आले आहे.






























































