
कल्याण, डोंबिवली शहरांना विविध जलशुद्धीकरण केंद्रांमधून होणारा पाणीपुरवठा मंगळवार, २ जून रोजी तब्बल १२ तास बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होणार आहेत. या कालावधीत कल्याण, डोंबिवली तसेच ग्रामीण भागातील अनेक परिसरांना पाणीपुरवठा होणार नसल्याने नागरिकांनी आवश्यक तेवढाच पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
महानगरपालिकेच्या बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा येथील जल शुद्धीकरण केंद्रांमधून होणारा पाणीपुरवठा मंगळवारी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे कल्याण पूर्व व पश्चिम, डोंबिवली पूर्व व पश्चिम तसेच कल्याण ग्रामीण विभागातील मांडा-टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी आणि इतर गावांमध्ये पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात येणाऱ्या तांत्रिक व देखभाल कामांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
काटकसरीने वापर करा !
पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने संबंधित भागातील नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा व आवश्यक तेवढाच पाणीसाठा करून महानगरपालि केस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता महेश डावरे यांनी केले आहे.
























































