इराणमध्ये एकाच दिवसात 12 कैद्यांना फासावर चढवले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराणमध्ये बुधवारी एकाच दिवसात अमली पदार्थांची तस्करी, हत्या आदी गुह्यांतील 12 कैद्यांना फासावर चढवण्यात आले. गंभीर गुह्यांतील कैद्यांना कुठलीही दयामाया न दाखवता फाशी देण्यात इराणचा पहिला क्रमांक लागतो. बुधवारी फाशी दिलेल्या 12 जणांमध्ये एका महिला कैद्याचा समावेश होता. हे सर्व कैदी बलुचिस्तानचे रहिवासी असून सुन्नी समाजाचे होते. इराणमध्ये सातत्याने दिल्या जात असलेल्या फाशीमुळे मानवाधिकार संघटनांनी चिंता व्यक्त केली आहे. देशात 2021 मध्ये 314 कैद्यांना फासावर चढवण्यात आले.