
लॅपटॉप विक्रीच्या बहाण्याने व्यवसायिकाला 15 लाखाचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भरत निलेश कुमार (वय 26, रा.रोपसी जालोर, राजस्थान) यांच्या विरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केतन सुनिल पळशीकर (वय 36,रा. नारायणपेठ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी केतन संगणक अभियंता असून, लॅपटॉप विक्री बरोबरच दुरुस्तीचा ते व्यवसाय करतात. आरोपी भरत कुमार होलसेलमध्ये लॅपटॉप विक्री करतो. त्यातुनच त्यांच्यात आर्थिक व्यवहार झाला होता. केतन यांनी आरोपीला आरटीजीएसद्वारे 5 लाख रुपये दिले. त्यानंतर आणखी 10 लाख रुपये दिले होते. मात्र ठरल्याप्रमाणे त्याने केतन यांना लॅपटॉप दिले नाहीत. त्यानुसार केतन यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. तपास पोलिस उपनिरीक्षक राकेश सरडे करीत आहेत.




























































