लातूरमध्ये आढळले कोरोनाचे 17 रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 326 वर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूरमध्ये आज कोरोनाचे 17 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 326 वर पोहोचली आहे. रविवारी  लातूर जिल्ह्यातील 189 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आलेले होते. त्यामध्ये 165 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून 17 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत तर 7 जणांचे अहवाल अनिर्णित आलेले आहेत.

विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्थेत घेण्यात आलेल्या 66 व्यक्तींच्या स्वॅबपैकी 58 जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. 4 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले असून 4 जणांचे अहवाल अनिर्णित आलेले आहेत. लातूर शहर महानगर पालिकेकडून तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या 21 स्वॅब पैकी 18 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून 2 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आलेले आहेत. एका व्यक्तीचा अहवाल अनिर्णित आलेला आहे. उपजिल्हा रुग्णालय उदगीर येथून 66 जणांचे स्वॅब तपासणीसाठी आलेले होते त्यामधील 59 जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. तर 7 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आलेले आहेत अशी माहिती विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली आहे.