
परदेशी बँकेचे 17 लाख रुपये चोरून पळालेल्या कारचालकाला अखेर मरीन ड्राईव्ह पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. नरेश यादव असे त्याचे नाव असून कर्ज फेडण्यासाठी चोरी केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
नरीमन पॉइंट येथे एक परदेशी बँकेचे कार्यालय आहे. गोरेगाव येथे राहणारे एक जण त्या बँकेत सहाय्यक व्यवस्थापक म्हणून काम करतात. ते रोज जमा होणारे पैसे गोळा करणे आणि क्लिरिंगचे काम करतात. गेल्या आठवडय़ात ते नेहमीप्रमाणे कामावर आले. ते कारचालक नरेशसोबत पैसे कलेक्शनसाठी गेले. त्याने एका बँकेतून सहा लाख रुपये काढले. त्यानंतर पैसे घेऊन ते कफ परेड येथील सौदीच्या दूतावासात गेले. त्याने दूतावास कार्यालयातून 85 हजार रुपये असे मिळून 17 लाख रुपये जमा केले. ती रक्कम त्याने बॅगेत ठेवली होती.
ते कुवेत दूतावासात काही डी. डी. घेण्यासाठी ते गेले. त्याने पैसे असलेली गाडी दूतावासाच्या परिसरात पार्क केली. काही वेळाने ते दूतावासाच्या कार्यालयातून बाहेर आले. तेव्हा त्यांना गाडीत नरेश दिसला नाही. त्याने नरेशला फोन केला असता त्याचा फोनही बंद होता. घडल्याप्रकरणी त्याने मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना नरेशची माहिती मिळाली. अखेर पोलिसांनी नरेशला अटक केली. नरेशवर बँकेसह दोन मित्रांकडून कर्ज घेतले होते. ते कर्ज फेडण्यासाठी त्याने चोरी केल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी नरेशकडून दहा लाख रुपये हस्तगत केले आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावली आहे.

























































