शासकीय अधिकारी–कर्मचाऱयांच्या बदल्या वादग्रस्त ठरल्या आहेत. पण बदल्यांच्या मुदतीच्या आजच्या शेवटच्या दिवशी विविध सहा विभागांतील 179 कर्मचाऱयांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये महसूल विभागातील कर्मचाऱयांच्या बदल्यांचाही समावेश आहे.
शासकीय कर्मचारी– अधिकाऱयांच्या बदल्या करण्यास शिंदे–फडणवीस सरकारने जून महिन्याच्या अखेरपर्यंत मुदतवाढ दिली होती. मध्यंतरी तर महसूल विभागातील कर्मचाऱयांच्या मध्यरात्रीनंतर बदल्यांचे आदेश जारी झाले होते. पण या बदल्या अतिशय वादग्रस्त ठरल्या. अखेरीस ‘मॅट’ने महसूल विभागातील बदल्यांना स्थगिती दिली.
बदल्यांचे आदेश जारी करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. मागील काही दिवसात झालेल्या बदल्या वादग्रस्त ठरल्याने मंत्रालयीन कर्मचाऱयांचे या बदल्यांकडे लक्ष लागले होते. त्यामुळे सरकारने अतिशय सावधपणे बदल्या केला त्यामध्ये काwशल्य विकास व उद्योजकता विभाग, सामान्य प्रशासन, उच्च व तंत्रशिक्षण उद्योग व ऊर्जा विभाग नियोजन विभाग, महसूल व वन विभाग आणि शालेय शिक्षण विभागातील सुमारे 179 बदल्यांचा समावेश आहे. शेवटच्या दिवशी फक्त बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले नाहीत तर पूर्वी केलेल्य काहींच्या बदल्या रद्द करण्यात आल्या. काही जणांना प्रतिनियुक्ती देण्यात आली. महसूल विभागातील यापूर्वीच्या बदल्या गुपचूप केल्या होत्या पण आता केलेल्या बदल्यांची यादी सरकारच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे.



























































