अकोल्यात 18 जणांना कोरोनाची लागण, एकूण रुग्णसंख्या 415 वर

614

अकोल्यात आज दिवसभरात कोरोना संसर्ग तपासणीचे 277 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 259 अहवाल निगेटीव्ह तर 18 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. रविवारी रात्री आणखी  22 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातल्या तिघांना घरी सोडण्यात आले तर उर्वरित 19 जणांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. तर आज एका  40 वर्षीय महिलेचा उपचारादर्म्यान मृत्यू झाला आहे. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवाल असलेल्या व्यक्तींची एकूण संख्या 415 झाली आहे.  तर आजअखेर प्रत्यक्षात 139 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.

आज सकाळी पॉझिटीव्ह आलेल्या 9 रुग्णांपैकी चार पुरुष व  5 महिला आहेत. या रुग्णांपैकी तीन जण हे फिरदौस कॉलनी येथील रहिवासी आहेत. तर अन्य महसूल कॉलनी, अण्णाभाऊ साठे नगर अकोट फैल, देशमुख फैल,अकोट फैल, मोहता मिल नानकनगर, गोकुळ कॉलनी भुईभोर गॅसजवळ अकोट येथील रहिवासी आहेत.

तर, आज सायंकाळी पॉझिटीव्ह आलेल्या 9 रुग्णांपैकी 7 पुरुष व 2 महिला आहेत. या रुग्णांपैकी दोन जण हे न्यु राधाकिसन प्लॉट येथील रहिवासी आहेत. तर अन्य  रणपिसेनगर, गोरक्षण रोड,  पावसाळे ले आऊट कौलखेड रोड, सिंधी कॅम्प, शिवर, बाळापूर व पातुर येथील रहिवासी आहेत.

139 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

आता सद्यस्थितीत 415  जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील 25 जण (एक आत्महत्या व 24 कोरोनामुळे) मयत आहेत.  तर रविवारी रात्री 22 जणांना  डिस्चार्ज दिला आहे. आता एकूण व्यक्तींची संख्या 251  झाली आहे. तर सद्यस्थितीत 139 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या