सावधान! लहान मुलांनाही होतेय म्युकरमायकोसिसची लागण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना रुग्णांना होणारा म्युकरमायकोसिस म्हणजेच ब्लॅक फंगस हा आजार आता देशभरात हातपाय पसरू लागला आहे. आतापर्यंत फक्त तरुण व वृद्धांमध्ये दिसणाऱ्या या आजाराने आता मुलांनाही त्याच्या जाळ्यात ओढले आहे. काही दिवसांपूर्वी एका 15 वर्षाच्या मुलाला याची लागण झाल्याचे समोर आले होते. आता राजस्थानमध्ये चक्क एका दीड वर्षाच्या बाळाला याची लागण झाली आहे.

राजस्थानमधील बिकानेरमधील एका रुग्णालयात या बाळावर उपचार सुरू आहेत. एका बालकाला म्युकरमायकोसिसची लागण होण्याची देशातील ही पहिलीच घटना आहे. मात्र आता त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे.

15 वर्षाच्या मुलाला झालेली कोरोनाची लागण

गुजरातमधील अहमदाबाद येथील एका 15 वर्षाच्या मुलाला याआधी म्युकरमायकोसिसची लागण झाली आहे. त्या मुलाला कोरोनाची लागण झाली होती. त्यावर उपचार सुरू असतानाच त्याच्यात म्युकरमायकोसिसची लक्षणं दिसून आली.

कोरोना नसलेल्यांनाही होतेय म्युकरमायकोसिसची लागण

पंजाबमध्ये गेल्या काही दिवसांपासून म्युकरमायकोसिसच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मात्र या रुग्णांमध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पंजाबमधील 159 रुग्णांपैकी 32 रुग्णांना कधीच कोरोना झालेला नाही. ही बाब सर्वांचीच चिंता वाढवणारी आहे