
भाजपच्या राज्यात आता गंगाजलही महागले आहे. केंद्रातील मोदी सरकारने गंगाजलवर 18 टक्के जीएसटी लावला आहे. हिंदू धर्मात गंगाजलाचे मोठे महत्त्व आहे. धार्मिक कार्यात शुद्धीकरण, अनुष्ठान आणि पूजा करण्यासाठी गंगाजलचा वापर केला जातो. अशावेळी गंगाजल महागल्याने त्यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
मोदी सरकारने 2016 मध्ये ‘गंगाजल तुमच्या दारी’ ही योजना सुरू केली होती. हृषिकेश आणि गंगोत्री येथील गंगाजल या योजनेत दिले जाते. गंगाजल आता ऑनलाइन मागवल्यास स्पीड पोस्ट शुल्कासह 250 मिली लीटरची एक बॉटल 125 रुपयांना, दोन बॉटल 210 रुपयांना तर चार बॉटल 345 रुपयांना मिळणार आहेत.
























































