१९ उमेदवारांची माघार, ३२ जागांसाठी १०३ उमेदवार रिंगणात, नगराध्यक्षपदासाठी ६ उमेदवार रिंगणात; रत्नागिरी नगर परिषद 

रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नगरसेवक पदासाठीच्या १९ उमेदवारांनी माघार घेतली. नगराध्यक्षपदासाठी रिंगणात असलेल्या एकाही उमेदवाराने माघार घेतली नाही. रत्नागिरी नगर परिषदेच्या ३२ जागांसाठी १०३ आणि नगराध्यक्ष पदासाठी ६ उमेदवार रिंगणात आहेत.

रत्नागिरी नगर परिषदेच्या ३२ जागांसाठी १३३ उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यापैकी १० अर्ज छाननीत बाद झाले होते. उर्वरित १२३ अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी १९ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता १०३ उमेदवार रिंगणात आहेत. नगराध्यक्षपदासाठी ७ उमेदवारांनी अर्ज भरले होते त्यापैकी एक अर्ज बाद झाला. सहा अर्ज वैध ठरले. आज नगराध्यक्षपदाच्या एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे सहा उमेदवार रिंगणात आहेत.