शरद पवार यांच्याकडून तत्काळ 1 हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा पुरवठा

sharad-pawar-new1

राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा भासत असल्याचे समजताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी तात्काळ 1 हजार इंजेक्शन्स उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सर्वसामान्यांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात आज जनता दरबार आयोजित केला होता. त्याचवेळेस शरद पवार यांनी अचानक भेट दिली आणि आरोग्य मंत्र्यांशी चर्चा केली. त्यांनी कोरोनावरील उपचारांची माहिती घेतली. इंजेक्शनचा तुटवडा भासत असल्याचे समजताच सर्वप्रथम गरजू आणि गरीब जनतेसाठी या रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा वापर करा अशी सूचनाही शरद पवार यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना केली. त्यावर कार्यतत्पर आणि जनतेची काळजी करणारा नेता कसा असावा याचे पुन्हा एक नवे उदाहरण शरद पवार यांनी घालून दिले आहे अशा शब्दात राजेश टोपे यांनी भावना व्यक्त केल्या.

आपली प्रतिक्रिया द्या