अपहरण करून नेले जंगलात, वीस वर्षीय तरुणीवर 14 दिवस बलात्कार

rape
प्रातिनिधिक फोटो

राजस्थानमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका वीस वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिला जंगलात नेण्यात आले. आणि तब्बल 14 दिवस तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

राजस्थानमध्ये एक तरुणी आपल्या मामाच्या लग्नाला गेली होती. तेव्हा शौचालयाला जात असताना एका अज्ञात व्यक्तीने तिला दुचाकीवरून पळवून नेले. नंतर जंगलात तिला बांधून ठेवून तिच्यावर 14 दिवस बलात्कार केला.

नंतर पीडित मुलीने हिंमत दाखवत तिथून पळ काढला आणि कुणाच्या तरी मोबाईलवरून तिने आपल्या वडिलांना फोन केला आणि तिची सुटका झाली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या